उर्दू साहित्यिक आणि विचारवंतांचा बेशरमपणा
आमचे साहित्यिक आणि विचारवंत वर्तमानातल्या घटनांवर बोलायला तयार नसतात, ही बाब खेदाची आणि शरमेचीदेखील आहे. खेद आणि शरम यासाठी की, साहित्यिक, विचारवंत कोणत्याही समाजाचा मुख्य आधार असतात. त्यांची स्थिती एका थिंक टँकसारखी असते. ज्या समस्या समाजासमोर उभ्या असतात, त्याचा सामना करण्यासाठी हे सांस्कृतिक प्रतिनिधी समाजमन तयार करत असतात.......